भारतामध्ये 4 ते 16 वयाच्या 12% विद्यार्थांना Psychometric Disorders आढळून येतात. NCRB चा  रिपोर्ट सांगतो की 4 विदयार्थी रोज आत्महत्या करतात . 10%विद्यार्थांना mental health illness आहे. context मध्ये बघितलं तर जपानच्या लोकसंख्येपेक्षा जास्तं आहे. याचा अर्थ गंभीर गोंधळ असू शकतो का ? आज मुलांना शाळेत प्रत्येक सेकंद ला बदलत जाणाऱ्या जगाचा सामना करण्यासाठी आपण तयार करतो आहे का ? की आजही आपली शिक्षण व्यवस्था ब्रिटिशांनी  दिलेल्या 100 वर्षाच्या प्राचीन व्यवस्थेसारखी आहे . 1917 मध्ये Sadler commission recommendation नंतर आपल्याला आपली schooling system मिळाली . व ब्रिटिशांना नोकर वर्गाची सेना.  ज्यामुळे  इंग्रजांना कारखान्यासाठी नोकर वर्गाची निर्मिती झाली. आजही ब्रिटिशांच्या काळाची education system आपल्या देशात  अनुभवयाला मिळते का? आपल्या शाळांमध्ये मुलांना 60,70, 80 च्या बॅचेस मध्ये तयार केल जात. विद्यार्थांना साधं बोलण्याची मुभा सुध्दा दिली जाते की नाही यात शंका आहे . कारण विद्यार्थांना  no authority वागणूक स्कूल मध्ये मिळत आहे का ? याची पळतळणी स्वतःच करणे गरजेचं आहे. No talking , सुई पटक शांती, open page 65 and solve question #7, Ask permission for going to  toilet. याप्रकारे 6 तास विद्यार्थांना ऑर्डर कश्याप्रकारे फॉलो करायचे यासाठी ट्रेन केल जात. आजही शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या प्रमाणे स्टडी झाली तर best student, त्याचप्रमाणे नोकरी करताना बॉस जे सांगणार ते ऐकलं तर बेस्ट वर्कर म्हणुन मान्यता दिली जाते. आम्ही विद्यार्थी शैक्षणिक प्रवास करुण नवीन जगात प्रवेश करतो. तेव्हा मोठया ओसाडलेल्या डोंगरासारखा प्रश्न उभा राहतो what to do next ? कारण आम्ही 12 वर्ष तेच केल आहे जे आम्हाला सांगितल्या गेल . मागे वळून बघितलं तर लक्षात येत की नुसते instructions follow करुन आपण कुठपर्यंत पोहचलो. हा विचार मानसिक ताण निर्माण करून जातो . म्हणुन creative, collaboration, communicative या महत्वाच्या बाबी अंगीकृत करुण काम करता येणे आजच्या काळाची गरज आहे. परंतु यासाठी कुठली मान्यता दिली जात नाही . आमचं सुरु आहे Ratta Mar system (A For? = Apple,  B for ?= Ball.)

             Wipro ने एका सर्वेक्षणामध्ये एक चौकोन विद्यार्थांना दिला. तो फिरवायला सांगीतला आणि  चोकोनाचा आकार बदलतो का असा प्रश्न केला असल्यास 50%विद्यार्थ्यांचं उत्तर Yes स्वरूपाचं निदर्शनास आल. विशेषता हे सर्वेक्षण ग्रामीण भागातील नसून भारतातली 89 स्कूल मधील आहे. ज्या स्कूल मध्ये library, laboratory , सारख्या सोई- सुविधा उपलब्ध आहे . ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विचार केला तर ASER रिपोर्ट सांगतो की 8  वर्गातील मुलाला 4  वर्गातील वाचन आणि गणित सोडविणे कठीण जातंय .हे वास्तव मी सुध्दा अनुभवलं आहे. आपल education system,  school system , Structure विद्यार्थ्यांनी exam pass होणे आणि जास्तं मार्क्स आणणे एवढ्यावरच का सीमित राहत? हा प्रश्न नेहमी खुणावतो. आजच्या काळात बघितलं तर भारतातील प्रत्येक विध्यार्थी math ला घाबरतो. कारण math च्या solution ची method teacher ला जी सहजरीत्या येते तीच सांगितली जाते.  एखाद्या विद्यार्थ्याने creative किंवा method change केली तर solution चुकीचं मानलं जातं . यामुळे विद्यार्थाला मार्क्स तर मिळतात परंतु विदयार्थी discouraged होतो . स्वतःला explore करण्यासाठी विदयार्थी passive Consumer आहेत . यामुळे creativity कमी झालेली आढळते . आज बघतोय आपणं की school मध्ये predefined subject जो पाठांतर करायचा आहे. 3 महिन्याची exam दिली की सर्व डोक्यातून रफु चक्कर होवून जात व Brutal सायकल रिपीट होत राहतं . प्रत्येक successful adult ला स्वतःच्या भविष्यातील आयुष्याच्या निर्णयाची निवड  करायची असते परंतु निर्णय घेवू दिले जात नाही . Imagine करुयात की प्रत्येक सेकंद ला आपल्याला मार्गदर्शक आहे.या क्षणी मनस्थिती क्रूर पणाची बाजू सावरण्याचा प्रयत्न करायला लागते . 


         आपल्या schooling मध्ये सुध्दा आयुष्याचा तिसराच व्यक्ती IN charge person असतो . विद्यार्थ्यासाठी व school साठी ज्या चांगल्या बाबी आहेत त्याचं करायला सांगितल्या जातात . म्हणुन 7 तास school 4 तास tuition तर आठवड्याच्या सुट्टी ला एक्स्ट्रा क्लास . हे नेमक कश्यासाठी करतो विद्यार्थाला माहिती नाही . Scope of interest सोडा, साध  खेळणं आणि आवडीचा खेळ सुध्दा पाहण्याचा स्वतंत्र  हरवून बसलो आम्ही . आता एक नवीन thought आलाय की मन शांत करण्यासाठी मोबाइल चा वापर . आम्ही सुध्दा सोशल मीडिया वरती like comment च्या मागे धाव घेत सुटलो आहे . School मध्ये शिक्षकांना follow करा तर घरी  social media वरती जास्त followers असणाऱ्या मनुष्याला यामुळे स्वतःच्या जीवनाचा control सुटल्याचा  उद्धार होतांना आम्हाला दिसतो आहे . अनेक study ने सिद्ध केल आहे की  students autonomy ला encourage केल्याने less board, More confidant, Better in practice life. याचा विकास होतो. 

         प्रत्येक motivational speaker Follow Your Passion या तीन Words ने आपल्या भाषनाची सुरुवात करतोय. परंतु school व related activities ने विद्यार्थ्यांचं freedom आयुष्यातून काढून टाकल्या सारख वाटत . त्यामूळे Passion follow करण्याची संधी प्राप्त होत नाही . इतरांना impress करण्याच्या भानगडीत बालपणाला activity ने भरून काढलय .same think same Student प्रकारची विचारसरणी अंमलबजावनी करतो आहे . विचार करायला गेल तर लक्षात येत की 60 मुलांना सारखा interest असेल का ? आपण विद्यार्थ्यांचं नैसर्गिक motivation suppress करुन trophy, grades याला follow करायला शिकवतो आहे.आपल्या  system मध्ये खूप talent & Potential हे ओळखून  ग्राउंड ला काम करण्याची गरज आहे . ग्रामीण आणि आदिवासी भागात तर शिक्षणाच्या दृष्टीने इतर तुलनेत भीषण उदासीनता आढळून येते. 

 

         Finland मध्ये school strictly for non profit पद्धतीने चालविण्याचा प्रयत्न केला जातो त्यामूळे private school संख्या तुरळक स्वरूपाची आढळून येते. पालक सुध्दा school ranking न बघता घरालगत असणाऱ्या school बघतात. या school मध्ये poor & Rich दोन्ही विदयार्थी समान शिक्षणाचा लाभ घेतात.  Rich Family school development साठी विशेषता जूपरीने लक्ष देतात व Paradise करतात. हे आपल्या India मध्ये सुद्धा पाहायला मिळत परंतु loophole सुध्दा आढळून येतात. भारतात बघितलं तर 10 लाख शिक्षकांची कमतरता आहे. आणि जे  शिक्षक शिकवतात ते कितपत Trained आहे याची पडताळणी स्वतःच करुण बघायला हवी. शिक्षणाचं क्षेत्र सोडुन आज आपण सर्वच बाबीत Paradise करण्याचा प्रयत्न करतो आहे का ? शिक्षणा बाबत गांभीर्याने फरश्या चर्चा होताना दिसत नाही .  शेवटीं एक प्रश्न तोंड वासून उभा राहतो की  या सर्व बाबतीत चुकी कुणाची आहे. ब्रिटिश, विदयार्थी, शिक्षक, की पालक ? 

 

लेखक.

आकाश मोडक 

सह- संस्थापक एकलव्य संस्था.